esakal | DRDOकडून रणगाडाविरोधी पोर्टेबल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

MPATGM misile

DRDOकडून रणगाडाविरोधी पोर्टेबल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (DRDO) रणगाडाविरोधी स्वदेशी पोर्टेबल क्षेपणास्त्राची बुधवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे याचं वजन कमी असून ते कोणत्याही व्यक्तीला एकट्यानं सहज डागता येईल अशी याची रचना आहे. याला मॅन पोर्टेबल अँटिटँक गाईडेड मिसाईल (MPATGM) असं संबोधलं जातंय. आत्मनिर्भर भारत अभियानाला आणि भारतीय लष्कराच्या क्षमता अधिक सक्षम करण्याला या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळं मोठी चालना मिळाली आहे. (DRDO successfully tests Man Portable Anti Tank Guided Missile aau85)

हे क्षेपणास्त्र मॅन पोर्टेबल लॉन्चरच्या माध्यमातून याची चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान, या क्षेपणास्त्रानं लक्ष्याचा थेटपणे अचूक वेध घेतला. कमी पल्ल्याच्या लक्ष्यासाठी हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आलं आहे, अशी माहिती DRDOनं दिली आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान मिशनची सर्व उद्दीष्टे पूर्ण झाली.

न्यू जनरेशन आकाश (Akash-NG) क्षेपणास्त्राचीही चाचणी

DRDOकडून आणखी एक महत्वाचं ध्येय गाठलं ते म्हणजे न्यू जनरेशन आकाश (Akash-NG) या जमिनीवरुन आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचीही बुधवारी इंटेग्रेटिड टेस्ट रेंजवरुन (ITR) ओडिशाच्या समुद्रकिनारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून भारताकडून अशा अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामुळे भारतीय सैन्य दलांना पाकिस्तान आणि चीनसारख्या शेजारील देशांचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रांस्त्रांची मोठी ताकद उपलब्ध होणार आहे.

loading image