DRDO Drone Crash: कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये DRDOचे ड्रोन दुर्घटनाग्रस्त, क्रॅशमागील कारण अद्याप अस्पष्ट

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) तपास मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) रविवारी सकाळी कर्नाटकातील चित्रदुर्गातील एका गावाजवळील शेतात कोसळले.
DRDO Drone Crash: कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये DRDOचे ड्रोन दुर्घटनाग्रस्त, क्रॅशमागील कारण अद्याप अस्पष्ट

DRDO Drone Crash in Karnataka: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) तपास मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) रविवारी सकाळी कर्नाटकातील चित्रदुर्गातील एका गावाजवळील शेतात कोसळले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, TAPAS चाचणीदरम्यान UAV क्रॅश झाला आहे.

तपास ड्रोन डीआरडीओ विकसित करत आहे

याबाबत संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, "डीआरडीओने विकसित केलेले तपास ड्रोन कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका गावात चाचणीदरम्यान क्रॅश झाले."

अपघातस्थळ पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती

त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, "डीआरडीओ अपघाताची माहिती संरक्षण मंत्रालयाला देत आहे आणि अपघातामागील विशिष्ट कारणांचा शोध घेतला जात आहे." त्याचवेळी ड्रोन अपघाताचे वृत्त पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळ पाहण्यासाठी गर्दी केली होती. चित्रांमध्ये खराब झालेले UAV आणि त्याची उपकरणे खुल्या मैदानात विखुरलेली दिसली.

तपास ड्रोन पूर्वी रुस्तम-२ या नावाने ओळखले जात होते

हवाई देखरेखीसाठी टॅक्टिकल एअरबॉर्न प्लॅटफॉर्म - ओव्हर होराईझन -201 किंवा Tapas BH-201 हे एक लांब पल्ल्याचे मानवरहित हवाई वाहन आहे, जे पूर्वी रुस्तुम-II म्हणून ओळखले जात असे.

DRDO Drone Crash: कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये DRDOचे ड्रोन दुर्घटनाग्रस्त, क्रॅशमागील कारण अद्याप अस्पष्ट
Nitin Gadkari : इंडिया आघाडीतील पक्षाकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; ''कॅगच्या रिपोर्टनंतर...''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com