माओवादी नेता कुंदन पहानची शरणागती

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

2008 मध्ये कुंदनने एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. तसेच, रोकड घेऊन निघालेल्या एका बॅंकेच्या वाहनातून तब्बल 5 कोटी रुपये लुटून नेले होते. विविध गुन्ह्यांत हवा असलेल्या कुंदनची माहिती देणाऱ्यास 15 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

रांची - खतरनाक माओवादी नेता कुंदन पहान याने आज झारखंड पोलिसांसमोर शरणागती पत्करली. कुंदनवर 128 प्रकारचे विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

2008 मध्ये कुंदनने एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. तसेच, रोकड घेऊन निघालेल्या एका बॅंकेच्या वाहनातून तब्बल 5 कोटी रुपये लुटून नेले होते. विविध गुन्ह्यांत हवा असलेल्या कुंदनची माहिती देणाऱ्यास 15 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. कुंदनने आज अतिरीक्त पोलिस महासंचालक आर.के. मलिक यांच्यासमक्ष शरणागती पत्करली.

सरकार व पोलिसांकडून 'नवी दिशा' या अभियानाअंतर्गत माओवाद्यांना आत्मसमर्पणाची शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असून, ती न दवडता माओवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, असे आवाहन मलिक यांनी या वेळी बोलताना केले. आपण आयुष्यातील 20 वर्ष वाया घालवली असून, यापुढे राज्याच्या विकासासाठी मदत करण्याची आपली इच्छा असल्याचे कुंदनने म्हटले आहे. 

Web Title: Dreaded Maoist leader Kundan Pahan surrenders in Jharkhand