
गुगल मॅप पाहून प्रवास करताना अनेकदा धोकादायक रस्ते, बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून गेल्यानं दुर्घटना घडल्या आहेत. आता उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये रात्री एक वाजता गुगल मॅप पाहून घरी परतणाऱ्या तरुणांची गाडी थेट रेल्वे ट्रॅकवर गेल्याची घटना घडली. तरुणांना बिहारच्या गोपालपूर इथं जायचं होतं पण त्यांना मॅपवर फक्त गोपालपूर दिसलं. मॅपने जवळचं गोरखपूरमधलं गोपालपूर गाव दाखवलं आणि तरुण त्यादिशेनं निघाले. मात्र वाटेत रेल्वे ट्रॅक आला. त्यांनी काहीच विचार न करता रेल्वे ट्रॅकवर गाडी घातली. पण समोरून वेगात मालगाडी आली. सुदैवाने लोकोपायलटनं इमर्जन्सी ब्रेक मारल्यानं दुर्घटना टळली.