

Rising Inflation and Drought Put Pressure on Indian Households as Six Percent Inflation Raises Interest Rate Hike Concerns
sakal
नवी दिल्ली: खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निर्धारित केलेली सहा टक्क्यांची कमाल मर्यादा पार करून ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ महागाईच्या दराने ६.०९ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. सप्टेंबर महिन्यात देशाचा एकत्रित किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के होता. महागाईच्या दराने दोन वर्षांनंतर प्रथमच सहा टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून पुढील काही महिन्यांमध्ये महागाईचा दर सहा टक्क्यांवरच राहणार असल्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे ‘आरबीआय’कडून डिसेंबर महिन्यात व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता वाढली आहे.