NCB : ड्रग्स विक्रेता ताब्यात; आर्यन खानशी संबंध?

सांताक्रुझ : ड्रग्स विक्रेता ताब्यात; आर्यन खानशी संबंध असल्याचा आरोप
aryan khan
aryan khanesakal

Cruise Drugs Bust: मुंबई ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (shah rukh khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींची रवानगी सध्या आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान काल (ता.८) रात्री सांताक्रूझ (Santa Cruz) परिसरात छापा टाकताना एका ड्रग्स विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने अरबाज मर्चंट (Arbaz merchant) आणि आर्यन खान यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे किंग खानचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज मर्चंटच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढील चौकशी सुरू

मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या माहितीनुसार, काल (ता.८) रात्री सांताक्रूझ परिसरात छापा टाकताना एका औषध विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने अरबाज मर्चंट आणि आर्यन खान यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे; पुढील चौकशी सुरू आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान Aryan Khan याचा जामीन अर्ज मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला होता. आर्यनच्या जामीन अर्जावर महानगर दंडाधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचं न्यायालयाने नमूद केलं. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर आर्यनची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली.

aryan khan
इस्रोत नोकरीची मोठी संधी; मुलाखतीसह मिळणार 'इतका' पगार

तुरुंगात आर्यनला कोणतीही विशेष वागणूक नाही

तुरुंगात आर्यनला कोणतीही विशेष वागणूक मिळाली नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला जेवण दिलं गेलं आणि झोपण्यासाठीची व्यवस्थासुद्धा इतरांप्रमाणेच होती. आर्थर रोड तुरुंगाच्या बराक क्रमांक १ मध्ये आर्यन आणि अरबाजला ठेवण्यात आलं आहे. या दोघांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना तुरुंगात क्वारंटाइन करण्यात आलं. कारागृहाच्या नियमांनुसार नवीन आरोपींना सुरुवातीचे काही दिवस (पाच ते सहा) क्वारंटाइन केले जाते. त्यानंतर त्यांची रवानगी इतर कारागृहात केली जाते. 'एबीपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यनला रात्री जेवणात मूगाची डाळ, भात, भाजी आणि चपाती देण्यात आली. आर्यनला सोमवारपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. सत्र न्यायालय बंद असल्याने त्याच्या जामिनाची याचिका दाखल होऊ शकत नाही.

aryan khan
"भाजपचं ईडीमध्ये जसं अस्तित्व दिसतं तसं कश्मीर खोऱ्यात दिसावं"

बुटातून काढलं चरस

मुंबईच्या समुद्रात 2 ऑक्टोबर रोजी एका लग्झरी क्रुझवर एनसीबीने छापेमारी केली होती. त्या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाची माहिती आता समोर येतेय. क्रुझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले त्यावेळी अरबाज मर्चंटची कसून चौकशी करण्यात आली. एनसीबी अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंटला विचारलं की तुझ्याकडे ड्रग्स आहे का? तेव्हा त्याने सांगितलं की त्याने आपल्या बुटात ड्रग्स लपवलं आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर अरबाजने आपल्या बुटातून एक ZIP LOCK पाऊच काढलं, त्यात चरस होतं. अरबाज मर्चंटने हे मान्य केलं आहे की तो आर्यन खानसोबत चरस घेत होता. ते क्रुझवर मजामस्ती करण्यासाठीच जात होते. जेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानला विचारलं तेव्हा त्याने हे स्वीकार केलं तो चरस घेतो. तसंच हे चरस क्रुझवर स्मोकिंगसाठी नेण्यात येत होतं. कॉरडेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणातील छापेमारीवेळी एनसीबीने केलेल्या पंचनाम्यात हे नमूद करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com