चंदिगडमधून 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

चंदिगड - पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता लागू झालेली असताना पोलिस आणि अन्य सुरक्षा संस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

चंदिगड - पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता लागू झालेली असताना पोलिस आणि अन्य सुरक्षा संस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पंजाबमध्ये 487 भरारी पथके आणि 506 अन्य पथके तयार करण्यात आले आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 1 हजार 61 जणांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले आहेत. तर 5 कोटी 90 लाख रुपयांची रोख, 26 कोटी रुपयांचे सोने, अडीच कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग केल्याच्या आतापर्यंत 12 हजार 792 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 12 हजार 119 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहेत. त्यामध्ये 50 तक्रारी या पेडन्यूजच्या असून त्यापैकी 19 तक्रारी स्वीकारण्यात आल्या आहेत. तर, 7 तक्रारी नाकारण्यात आल्या असून 24 तक्रारींवर विचाराधीन आहेत. पंजाबमधील अंमली पदार्थाचे व्यसन हा निवडणुकीतील एक प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतर अंमली पदार्थांची समस्या दूर करण्याचा दावा करत आहेत.

Web Title: Drugs worth Rs. 12 crores seized besides cash, liquor