esakal | Video: दारूड्याचा अर्धा तास कोब्रासोबतचा थरार पाहाच...
sakal

बोलून बातमी शोधा

drunk man dance with cobra snake at rajasthan

एक मद्यधुंद नशेत असलेल्या व्यक्तीने चक्क कोब्रासोबत 'खेळ' केला. कोब्राला जाता है तू कहाँ... असे म्हणताना अनेकदा आडवले. कोब्रासोबत त्याने वेगवेगळे चाळेही केले. कोब्रा अनेकदा चावला. कोब्रा चावल्यामुळे शरीर काळे-निळे पडले.

Video: दारूड्याचा अर्धा तास कोब्रासोबतचा थरार पाहाच...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): एक मद्यधुंद नशेत असलेल्या व्यक्तीने चक्क कोब्रासोबत 'खेळ' केला. कोब्राला जाता है तू कहाँ... असे म्हणताना अनेकदा आडवले. कोब्रासोबत त्याने वेगवेगळे चाळेही केले. कोब्रा अनेकदा चावला. कोब्रा चावल्यामुळे शरीर काळे-निळे पडले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग...

दारू प्यायलेला युवक नागीण डान्स करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजस्थानमधील दौसा येथील ही घटना आहे. मद्यधुंद नशेत असलेल्या युवकाने कोब्र्याची वाट अडवली आणि तिथेच त्याच्यासोबत तो गप्पा मारू लागला. कोब्र्याचा रस्ता अडवत असतानाच त्याच्याशी गप्पाही मारत राहिला. कोब्रा अनेकदा दंश मारत होता. पण, नशेत असल्यामुळे त्याला काही समजत नव्हते. अनेकदा दंश मारल्यामुळे त्याचे शरीर काळे-निळे पडले होते. दारू प्यायलेली व्यक्ती आणि नागामध्ये गावात तब्बल अर्धा तास खेळ सुरू होता. यावेळी नागरिकही उपस्थित होते. परंतु, दोघांच्या मध्ये कोणी पडले नाही.

दारूच्या नशेत असलेला युवक तब्बल अर्धा तास नागाला पकडून त्याच्यासोबत वेगवेगळ्या कसरती करत राहिला. कोब्र्याला गळ्यात घातले आणि उलटं-सुलटेही फिरवले. शिवाय, नागासोबत नागीण डान्सही केला. जमीनीवर बसून त्याची वाट अडवून त्याला कविता ऐकवली. नागाने अनेकदा दंश केल्यानंतर त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्नही केले. पण, नागाचे प्रयत्न अपयशी ठरत होते. नाग जाऊ लागला की तो पकडून आणायचा. नाग आणि मद्यधुंद युवकाचा नागीण डान्स संपूर्ण गावाने पाहिला. शिवाय, मोबाईलमध्ये कैदही केला. पण, नाग आणि युवकामधील जीवघेणा खेळ थांबवण्यासाठी पुढे सरसावण्याची हिंमत मात्र कोणात होत नव्हती.

...तोपर्यंत हातातील कोब्रा सोडलाच नाही

मद्यधुंद अवस्थेतील युवक काळा-निळा पडल्यानंतरही नागाला सोडायला तयार नव्हता. अखेर, अर्धा तासाच्या घटनेनंतर दोन युवकांनी धाडस करत मद्यधुंद युवकाच्या तावडीतून नागाची सुटका केली. मद्यधुंद अवस्थेतील युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा प्रकृतिबाबत माहिती मिळू शकली नाही. पण, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

loading image
go to top