
दुबई: संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल आंत्र्युप्रेनर कॉन्क्लेव्हमध्ये(जीईसी-२५) बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यातर्फे जगभर राबवण्यात येत असलेल्या ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा(एआय) उपयोग या प्रकल्पाची दखल घेण्यात आली. १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित या परिषदेमध्ये ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट’चे विश्वस्त प्रतापराव पवार, डॉ. विवेक भोईटे आणि डॉ. योगेश फाटके यांनी ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग या प्रकल्पाची माहिती दिली.