दुबई-अमृतसर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग, जाणून घ्या कारण

Dubai-Amritsar Air India Express f
Dubai-Amritsar Air India Express f

Air India Express flight : दुबईहून अमृतसरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे शनिवारी कराचीत इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. एका प्रवाशाला वैद्यकीय उपचाराची गरज होती. त्याला त्वरित मदतीची आवश्यकता होती. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमुळे विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.


एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमान प्रवाशांना घेऊन सकाळी 8.51 वाजता दुबईहून निघाले. विमानातील एका प्रवाशाला अचानक वैद्यकीय समस्या निर्माण झाली. त्यामुळे कराचीमध्ये दुपारी 12.30 वाजता इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. (Latest Marathi News)

प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात आली. प्रवाशावर उपचार केल्यानंतर विमानाने कराचीहून अमृतसरसाठी दुपारी 2.30 वाजता उड्डाण केले.

Dubai-Amritsar Air India Express f
भगतसिंग कोश्यारी आले महाराष्ट्रात; देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल

यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान टेक ऑफ केल्यानंतर सुमारे एक तासाने कन्नूरच्या दिशेने वळवण्यात आले होते. कारण वैमानिकाला विमानाच्या कार्गो होल्डमध्ये आगीचा इशारा देणारा दिवा दिसला होता. त्यावेळी फ्लाइटमध्ये क्रू मेंबर्ससह सुमारे 176 लोक होते.

Dubai-Amritsar Air India Express f
Sharad Pawar: कंत्राटी पोलीस भरतीवरुन शरद पवारांचा सरकारवर निशाणा! म्हणाले, "सरकार बदलण्याची वेळ"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com