वन्य प्राण्यांबरोबरील संघर्ष पडतोय महागात

elephant
elephant

नवी दिल्ली - वाढत्या शहरीकरणामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच वर्षांपासून वन्यप्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष सुरु आहे. या संघर्षात दोघांचेही मोठे नुकसान होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. वने आणि पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मानव-प्राणी संघर्षात दरवर्षी किमान ५०० माणसांचा मृत्यू होतो, तर किमान शंभर हत्तींना जीव गमवावा लागतो.  

पर्यावरण मंत्रालयाने प्राण्यांबरोबरील संघर्ष व्यवस्थापनावर एक माहितीपुस्तिका तयार केली आहे. तसेच, हत्तींबरोबरील संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना सुचविणारे पोर्टलही सुरु केले आहे. भारतात सध्या जंगलांमध्ये तीस हजारांहून अधिक हत्ती असून प्राणी संग्रहालयांमध्ये अथवा पाळलेले मिळून २७०० हत्ती आहेत. जंगलांमधील हत्तींची संख्या वाढत असून असून त्यांचा संचारही वाढत आहे. हे हत्ती झारखंडमधून छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रापर्यंत येत आहेत. मात्र, नवीन जागांमध्ये नवीन संघर्षही निर्माण होत आहे. 

सरकारकडून होत असलेले उपाय

  • हत्तींसाठी आणखी काही संरक्षित क्षेत्रे
  • हत्तींसाठी कॉरिडॉर
  • संरक्षित प्राण्यांच्या यादीत हत्तीचा 


दर्जा वाढवला 

  • हत्तींचा संचार असलेल्या ठिकाणी 
  • पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था


संघर्षाची कारणे

  • जंगलांचा आकार कमी होणे
  • शेतात आयते गवत मिळत असल्याने हत्तींकडून घुसखोरी
  • हत्तीच्या कळपाकडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
  • पक्ष्यांकडूनही नुकसान

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृत्यूची कारणे

  • हत्तींच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू
  • विजेच्या कुंपणांना धक्का, रेल्वेची धडक, शिकार यामुळे हत्तींचा मृत्यू

या प्राण्यांबरोबरही संघर्ष
वाघ, बिबटे, हरीण, साप, माकडे, रानडुक्कर, जंगली कुत्रे 

संघर्षाच्या इतर घटना

  • वनक्षेत्रालगतच्या भागात साप चावून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक
  • जंगलात शिकार मिळत नसल्याने वाघ, बिबटे, तरस यांचा लगतच्या गावांमध्ये वावर
  • हत्ती आणि रानडुकरांबरोबर सर्वाधिक संघर्ष
  • माकडांकडूनही मोठे नुकसान

प्राण्यांबरोबरील संघर्षात माणसांचे बळी (२०१४ ते २०१९)
हत्ती : २३९८
वाघ : २२४ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com