'स्लो सर्व्हर'ने 'डिजिटल सिग्नेचर' हँग ! 

'स्लो सर्व्हर'ने 'डिजिटल सिग्नेचर' हँग ! 

जळगाव : राज्यात एक मे 2018 ला ऑनलाइन 7/12 उताऱ्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, जळगावसह राज्यात अद्यापही डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यात डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम केवळ आठ टक्के झाले आहे. राज्य डिजिटल सिग्नेचरच्या कामात नगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जळगाव 22, नाशिक सहाव्या, नंदुरबार 25 तर धुळे 29 व्या क्रमांकावर आहे. 

हे आहेत टप्पे... 

7/12 संगणकीकरणाच्या कामात हाताने लिहावयाच्या सातबाऱ्याचे चावडी वाचन करणे, त्यात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करणे, त्याचे पुनर्लेखन, एडिट मॉडेलद्वारे नोंदी घेणे, नंतर ऑनलाइन सातबारा तयार करणे, अंतिमतः डिजिटल सिग्नेचरचा सातबारा तयार करून नागरिकांना देणे असे टप्पे आहेत. अनेक ठिकाणी संगणकीकृत 7/12 तयार झालेला आहे. मात्र, तो देण्यासाठी तलाठी सांगेल त्या ठिकाणावरून त्याची प्रिंट काढून आणावे लागते. नंतर तलाठी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करतो. 

चुका दुरुस्तीसाठी डिसेंबरची मुदत 

सातबाऱ्याच्या संगणकीकरणात चुका होण्याची शक्‍यता आहे. यामुळे सर्व शेतकरी, नागरिकांना आपल्या सातबारा उताऱ्यात काही चुका असतील त्या दुरुस्त करण्यासाठी डिसेंबरअखेरची मुदत दिली आहे. 

डिजिटल सिग्नेचरचे कामासाठी जे सर्व्हर वापरले जात आहेत, त्यांचा स्पीड स्लो आहे. यामुळे राज्यात सर्वच काम ठप्प झाले आहे. शासनाने ते सर्व्हर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते अद्यापही बदलण्यात आलेले नाहीत, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. हे सर्व्हर बदलले, तरी डिजिटल सिग्नेचरचे काम पूर्ण करण्यास किमान आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे चित्र आहे. 

डिजिटल सिग्नेचर झालेले काम असे : 
जळगाव ः 48 हजार 276 
नाशिक ः 2 लाख 34 हजार 973 
नंदूरबार ः 39 हजार 736 
धुळे ः 3 हजार 995 
नगर ः 5 लाख 5 हजार 594 
रायगड ः 2 लाख 85 हजार 264 
उस्मानाबाद ः 2 लाख 78 हजार 280 
यवतमाळ ः 2 लाख 76 हजार 466 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com