मुंबईहून राजधानीत 12-13 तासांत पोचता येणार

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांच्या समवेत दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचीकेली पाहाणी
मुंबईहून राजधानीत 12-13 तासांत पोचता येणार
ANI

सोहना (हरियाणा) : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे या महामार्गामुळे मुंबईहून राजधानीत बारा ते तेरा तासांत पोचता येणार आहे. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यांतून हा मार्ग जातो. सुमारे एक लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. यातील काही राज्यातील या रस्त्याचे काम पूर्णही झाले आहे.

मुंबईहून राजधानीत 12-13 तासांत पोचता येणार
न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठविली, कोरोना नियमांचं पालन अनिवार्य

हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील सोहना येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांच्या समवेत या महामार्गाची पाहाणी केली. या प्रकल्पाबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ‘‘चांगल्या रस्त्यांमुळे देशाची भरभराट होते. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते निर्माण करीत आहोत. स्टिलऐवजी स्टिल फायबरचा वापर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या महामार्गावरील सर्व्हिस रोडसाठी प्लॅस्टिकचा वापर केला जाणार आहे. देशभरात रस्ते बांधणीसाठी सरकारचा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न आहे.’’

शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा दीडपट भाव जमिनीला दिला आहे. रस्त्यासाठी पंधरा हजार हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. देशातील सर्वात मोठा महमार्ग असून, देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर १२ तासांत मुंबईत पोचता येईल. महामार्ग जास्त लांबीचा आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास तातडीने रुग्णालयापर्यंत पोचण्यासाठी हेलिकप्टर अँम्बुलन्सची सुविधाही असेल. रस्ते बांधणी करताना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने दिल्ललाही प्रदूषणातून दिलासा मिळेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com