
टॉर्च अन् मेणबत्तीच्या प्रकाशात आईने दिला बाळाला जन्म
वीज खंडित झाल्यामुळे एका महिलेने एनटीआर सरकारी रुग्णालयात सेल फोन, टॉर्च आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात आपल्या मुलाला जन्म दिल्याची बाब शुक्रवारी उघडकीस आली. ही घटना आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधील नरसीपट्टणम परिसरातील आहे. (Amid heavy power cuts, woman gives birth under torch light in Visakhapatnam)
हेही वाचा: महाराष्ट्र, कर्नाटकनंतर आता राजस्थानातही भोंग्यांची काँट्रोव्हर्सी, 'बंद'चे आदेश
अनकापल्ले या नव्याने स्थापित झालेल्या जिल्ह्यातील काही रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. याच दरम्यान कृष्णादेवीपाता नावाची महिला हिला बाळाच्या प्रसुती साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र वीजपुरवठा खंडित झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी कृष्णादेवीपाताच्या कुटूंबाना जास्तीत जास्त दिव्यांची व्यवस्था करण्यास सांगितले.
हेही वाचा: गांधींबाबत बेताल बोलणारा कालीचरण म्हणतो, 'मला त्याबाबत पश्चात्ताप...'
कृष्णादेवीपाताचे पती सांगतात, “त्यांनी मला मेणबत्त्या आणण्यास सांगितले आणि मध्यरात्री शक्य तितके सेलफोन आणि टॉर्च लाइट्सची व्यवस्था करण्यास सांगितले.”
“महिलेला प्रसूती वेदना होत असताना रुग्णालयातील जनरेटरमध्येही देखभालीअभावी बिघाड झाल्याचे लक्षात येताच आमच्याकडे तिच्यासाठी प्रकाशाचा स्रोत सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता” असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले.
Web Title: Due To Heavy Power Outages In Visakhapatnama Woman Gave Birth Under Torch Light And Candles
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..