टॅटूमुळे आरोपी गजाआड! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन व्हायरल केला होता व्हिडीओ

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती
due to tattoo accused arrested video made viral by abusing minor girl crime news marathi
due to tattoo accused arrested video made viral by abusing minor girl crime news marathiSakal
Updated on

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. अत्याचार करणाऱ्या नाराधमांनी विडिओ काढून तो समाजमाध्यमांवर शेअर देखील केला होता, या विडिओमुळे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली होती. चार जणांना पोलिसांनी अटक केली होती.

बुधवारी जिल्हा न्यायालयाने पीडित मुलीला न्याय देत चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पीडितेचे वकील विभास चटर्जी यांनी यांबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले व्हिडिओच्या आधारे आरोपींना शोधणे सोपे गेले, आणि त्यांच्या विरोधात सक्षम पुरावाही मिळाला, त्यामुळे न्यायालयाला आपल्या निर्णय देण्यास मदत झाली.

मुर्शिदाबादच्या लालबाग उपविभागीय कोर्टाच्या न्यायाधीश दिप्ता घोष यांनी दोषी बासुदेव मंडल, मिथुन दास, आकाश मंडल, आणि अरुण मंडल यांना प्रत्येकी २ लाख दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांच्या विरोधात (POCOSO ) भारतीय दंड संहिता आणि आईटी ऍक्ट च्या वेगवेगळ्या कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले. सदरील सुनावणी १२० दिवस चालली. त्यानंतर पीडित मुलीला न्याय भेटला.

सरकार करणार पीडितेला मदत

चॅटर्जी यांनी सांगितले " न्यायालयाने पीडितेला राज्य सरकारला ४ लाख रुपयांची मदत करण्याची सूचना दिल्या आहेत. तसेच दोषींकडून वसूल करण्यात येणारी ८ लाख रुपये रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे." उल्लेखनीय असे आहे की बंगालचा सर्वात मोठा उत्सव दुर्गा पूजेच्या अगोदर दोन दिवस हा न्यायनिवाडा झाला.

टॅटूमुळे भेटली शिक्षा

अत्याचार करताना शूट केलेला विडिओ पुणे, असम और कोलकत्ता या ठिकाणी फॉरेन्सिक प्रयोगशाळा येथे पाठवली होती. विडिओच्या तपासणी नंतर समजले की दोन आरोपींच्या हातावर टॅटू आहेत. आरोपींना अटक केल्यानंतर तसेच टॅटू आरोपींच्या हातावर मिळून आले. व्हिडिओतील आवाज आणि आरोपीच्या आवाजाची चाचणी केली असता तेही सारखे होते. या केसमध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या आधारे कोर्टाने आपला निर्णय दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.