बेळगावातील दुर्गामाता दौडमध्ये जवानांची उपस्थिती

मिलिंद देसाई
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

बेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी झाले. त्यामुळे जवानांच्या उपस्थितीने देशभक्तिची दौड शहर परिसरात पहावयास मिळाली.

बेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी झाले. त्यामुळे जवानांच्या उपस्थितीने देशभक्तिची दौड शहर परिसरात पहावयास मिळाली.

सोमवारच्या दौड़ला शिवतीर्थ येथून सुरवात झाली. प्रारंभी कर्नल बी. एस. घेवारी, मेजर जनरल उत्तम शिंदे यांच्या हस्ते पूजन करुण ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर संपूर्ण कॅम्प परिसर आणि इतर भागात निघालेल्या दौडीमध्ये देशसेवेची साक्ष पहावयास मिळाली.  

बेळगावच्या देदिप्यमान देशसेवेचा इतिहास दाखवणारी आजची दौड लक्षणीय ठरली. मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात दौडीत भाग घेऊन शिवप्रेमींना प्रोत्साहन दिले. 
काँग्रेस रोड, मराठा कॉलनी, नानावाडी, ग्लोब चित्रपटगृह रोड, इंडिपेन्डंट रोड, हायस्ट्रीट, चर्च स्ट्रीट, बेस्ट स्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट, तेलगू कॉलनी, के. टी. पुजारी रोड, दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक, गणपत गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, मेनसे गल्ली, कामत गल्ली, शेट्टी गल्ली, यंदे खूट  कडोलकर  गल्ली, बापट गल्ली आदि भागातुन दौड काढण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र चौक खडे बाजार येथे दौडची सांगता करण्यात आली  या ठिकाणी पोलिस उपायुक्त महालिंग नंदगावी, सुधीर गाड़गीळ यांच्या हस्ते पूजा करून ध्येयमंत्राने दौडीची सांगता झाली. 

दौडीच्या प्रारंभी मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी ध्वज घेऊन लष्करी गणवेशातच दौडीत सहभाग घेतला. काही अंतरापर्यंत दौडीत सहभाग घेतल्यानंतर युवकांकडे ध्वज सोपविण्यात आला. दुर्गामाता दौडीमध्ये बालचमु, युवक, युवती व आबालवृद्ध हजारोंच्या संख्येने सहभागी झाले.

Web Title: Durgamata Run in presence of Soldiers