हंगेरी, अल्जेरियाच्या दौऱ्यावरून उपराष्ट्रपती अन्सारी परतले

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आज आपला हंगेरी आणि अल्जेरियाचा पाच दिवसांचा दौरा पूर्ण करून मायदेशी परतले. या दोन्ही देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान हंगेरी आणि अल्जेरियाने दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी धोका असून, त्याचा समूळ नायनाट झाला पाहिजे असे स्पष्ट केले. हंगेरीचे अध्यक्ष जानोस अदेर आणि पंतप्रधान विकतोर ओरबन यांच्या बरोबरील चर्चेत दोन्ही नेत्यांनी मजबूत कायदेशीर चौकटीसाठी प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

भारत आणि हंगेरीने पाणी व्यवस्थापनावर दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मध्य युरोपमधील या देशाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते.

संरक्षणासह विविध क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य करण्यासाठी एका गटाची स्थापना केल्याचे हंगेरीच्या पंतप्रधानांनी सांगितले. भारताचा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेमध्ये आणि अणू पुरवठादार गटात भारताच्या सहभागाबद्दल हंगेरीच्या पाठिंब्याबद्दल उपराष्ट्रपती अन्सारी यांनी हंगेरीचे आभार मानले.

अल्जेरियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात उपराष्ट्रपती अन्सारी यांनी भारत आणि अल्जेरिया यांच्यातील द्विपक्षीय विषयांवर अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देलाझिज बुटेफिलका, पंतप्रधान अब्देलमलेक सेल्लाल आणि विदेशमंत्री रामतने लामामरा यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

Web Title: dy. president hamid ansari return in india