Coronavirus : फ्लिपकार्टही बंद, कोरोनावर एकत्रितपणे मात करण्याचे आवाहन

वृत्तसंस्था
बुधवार, 25 मार्च 2020

देशात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ११ वर पोहोचली असून कोरोनाग्रस्तांची संख्या ५३६ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीयांना पुन्हा एकदा संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून पुढील २१ दिवस कोणीही घराबाहेर पडू नये.

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाने थैमान घातलेल असतानाच फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी काल संबोधनपर भाषणात सांगितले. त्यामुळे अने ईकॉमर्स कंपन्यांनीही लॉकडाऊनचा स्विकार करत आप्लाय सेवा बंद केल्या आहेत. फ्लिपकार्टसारख्या मोठ्या कंपनीने देखील काही दिवसांसाठी आपली सेवा तात्पुरती बंद करत असल्याचे जाहीर केले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, फ्लिपकार्टने एक पत्रक जारी केले आहे, ज्यात लिहिले आहे की, 'आम्ही आमची सेवा तात्पुरती बंद करत आहोत. तुम्ही कायम आमच्यासाठी प्राधान्यक्रमावर राहिला आहात. आम्ही लवकरता लवकर परत सेवा देण्याचा प्रयत्न करू. सध्याचा काळ हा अत्यंत महत्वाचा आहे. देशासाठी घरात राहणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की, सर्वजण घरातच राहा. या हलाखीच्या वेळेला एकत्रपणे सामोरे जाऊ.' असे ट्विटमध्ये म्हणले आहे. देशातील सर्वच व्यवसायांवर बंधने घालण्यात आली असून, कोरोनाचा सामना करण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अनेक ई-कॉमर्स कंपन्या या काळात बंद राहतील. 

देशात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ११ वर पोहोचली असून कोरोनाग्रस्तांची संख्या ५३६ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीयांना पुन्हा एकदा संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून पुढील २१ दिवस कोणीही घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यामुळे संपूर्ण देश हा १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये गेला असून सर्व राज्यात संचारबंदी लागू करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-Commerce website Flipkart temporarily suspends its services due to coronavirus