अर्थसंकल्पाचे सादरीकरण अंमलबजावणीसाठी लवकर : मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून करता यावी म्हणून अर्थसंकल्पाचे सादरीकरण लवकर करण्यात येणार असल्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली - अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून करता यावी म्हणून अर्थसंकल्पाचे सादरीकरण लवकर करण्यात येणार असल्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आर्थिक धोरणासंदर्भात नीती आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदींनी अर्थतज्ज्ञांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आपल्या वर्तमान अर्थसंकल्पीय कार्यक्रमपत्रिकेत मॉन्सूनच्या आसपास अर्थसंकल्पाचा निधी प्राप्त होतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. परिणामी सरकारचे कार्यक्रम मॉन्सूनपूर्व कालावधीत इतर दिवसांच्या तुलनेत निष्क्रिय होतात. हा विचार समोर ठेवून अर्थसंकल्पाचे सादरीकरण लवकर करण्यात येत आहे. यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदींची नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच अंमलबजावणी करता येईल.'

यावेळी उपस्थितांनी काही सूचना आणि निरीक्षणे नोंदविली. कौशल्य विकास आणि पर्यटन क्षेत्रासंदर्भात सुचविलेल्या कल्पक दृष्टिकोनाचे मोदी यांनी यावेळी कौतुक करत उपस्थितांचे आभार मानले. मोदी यांनी पर्यटन क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्यात यावी अशी सूचना मोदी यांनी उपस्थितांना केल्याची नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पांगारिया बोलताना कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. उच्च दर्जाची कृषी उत्पादने घेऊन 2022 पर्यंत कृषी उत्पन्न दुप्पट कसे करता येईल, याबाबत उपस्थितांनी यांनी सूचना केल्याचेही पांगारिया यांनी सांगितले. शिवाय शेतकऱ्यांसाठी "डिजीटल पेमेंटस' संदर्भातही चर्चा केल्याची माहिती पांगारिया यांनी दिली.

Web Title: Early budget to authorise expenditure at start of fiscal year: PM Modi