

Police personnel at the encounter site where accused Aamir was neutralized in an early morning operation.
esakal
उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात पाच जणांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेतील मुख्य आरोपी आमिर याला पोलिसांनी रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत (Encounter) ठार केले आहे. आई आणि तिच्या चार निष्पाप मुलांची हत्या करून फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ही कारवाई केली.