उत्तर भारत भूकंपाने हादरला 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

या घटनेनंतर डेहराडूनमधील नागरिक घाबरून रस्त्यांवर आले. चंडीगडमध्येही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली होती.

नवी दिल्ली - दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारताला आज रात्री 10.33च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.

रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता 5.8 होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील रुद्रप्रयागजवळ जमिनीखाली 20 किलोमीटरवर होता, अशी माहिती हवामान खात्याने दिली. दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तराखंड या राज्यांसह इतर ठिकाणी हे धक्के जाणवले.

या घटनेनंतर डेहराडूनमधील नागरिक घाबरून रस्त्यांवर आले. चंडीगडमध्येही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली होती. या भूकंपात जीवित वा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती अद्याप मिळालेली नाही.

Web Title: Earthquake in Delhi NCR