पाकिस्तानसोबतचा तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून भारताने उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील उड्डाणे १५ मे पर्यंत थांबवली आहेत. या विमानतळांवरून दररोज जवळपास ४०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. विमान उड्डाणे रद्द केल्यानं प्रवाशांनी आपला प्रवास रिशेड्युल करावा किंवा एअरलाइन्सशी संपर्क करून माहिती घ्यावी असं आवाहन सरकारने केलंय.
India responds to Pakistan drone attacks with air strikes : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणाव वाढला असून युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून भारतावर सलग दुसऱ्या दिवशी हवाई हल्ले करण्यात आले आहेत. तर या हल्ल्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताकडून इस्लामाबाद आणि रावळपिंडी सारख्या शहरांना लक्ष्य करण्यात आलं आहे.