मध्य आशियासह भारतात भूकंपाचे धक्के 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

अफगणिस्तान- ताजिकीस्तान सीमा बुधवारी भूकंपाचा धक्काने हादरली. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातील भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थानसह जम्मू-काश्‍मीरलाही बसले.

नवी दिल्ली - अफगणिस्तान- ताजिकीस्तान सीमा बुधवारी भूकंपाचा धक्काने हादरली. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातील भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थानसह जम्मू-काश्‍मीरलाही बसले. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांतातही भूकंपाचे हादरे बसले. धक्‍क्‍यामुळे घाबरलेली मुले इमारतीमधून बाहेर पडताना नऊ जण जखमी झाले. 
भूकंपाचे केंद्रस्थानी अफगणिस्तान- ताजिकीस्तान सीमेवर 6.1 रिश्‍टर स्केल क्षमतेचा धक्‍का बसला, असे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे प्रमुख (कामकाज) जे. एल. गौतम यांनी सांगितले. दिल्ली, पंजाब व हरियान व राजस्थानमध्ये भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

श्रीनगर व परिसराला आज सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास भूकंपाचा मध्यम धक्का बसला. काही सेकंद जाणवलेल्या या धक्‍क्‍याने लोक घाबरून घराबाहेर पडले. काहींनी वाहनेही मोकळ्या जागेत आणली. 

Web Title: Earthquake in India with Central Asia