पहाटे मणिपूरला भूकंपाचे धक्के; तीव्रता 3.2 रिश्टर स्केल: Manipur Earthquake | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Earthquake

Manipur Earthquake : पहाटे मणिपूरला भूकंपाचे धक्के; तीव्रता 3.2 रिश्टर स्केल

गेल्या काही दिवसांपासून जगभरात अनेक भागांना भुकंपाचे हादरे बसत आहे. दरम्यान, पहाटे मणिपूरमधील नोनी येथे भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपामुळे जमिन हादरली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या मते, मंगळवारी पहाटे मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात तीव्रता ३.२ रिश्टर स्केलवर नोंदवण्यात आली होती. पहाटे 2.46 च्या सुमारास मणिपुरला हादरे बसले असून त्याची खोली 25 किलोमीटर होती. यापूर्वी 19 फेब्रुवारीला आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील नंदीगामा शहरात भूकंप झाला होता.

Gujarat : गुजरातमध्ये पेट्रो केमिकल कंपनीत ब्लास्ट; दोघांचा मृत्यू

एक दिवस पूर्वी 27 फेब्रुवारीला गुजरातमधील कच्छमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी नोंदवण्यात आली आहे. याआधी रविवारीही दोन भूकंपाचे धक्के जाणवले. त्यापैकी एकाची तीव्रता ४.३ इतकी होती. सोमवारी सकाळी 10.49 वाजता भूकंप झाला.

Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियानंतर KCR च्या मुलीला होणार अटक?, वाचा काय आहे प्रकरण

भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छमधील लखपतपासून 62 किमी उत्तर-ईशान्य दिशेला होता. रविवारी पहाटे ३.२१ वाजता गुजरातमधील राजकोटमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) याबाबत माहिती दिली होती.

टॅग्स :Earthquake