

देशातील दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. हिमाचल प्रदेशातील चंबा आणि तेलंगणातील नारायणपेठ येथे भूकंपाची नोंद करण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ आणि २.५ इतकी होती. सुदैवाने, या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा