esakal | VIDEO: थंडीपासून बचावासाठी लडाखमधील जवानांसाठी अपग्रेटेड सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

indian army

भारतीय लष्कराने (Eastern Ladakh) पूर्व लडाखमधील सैनिकांसाठी राहण्याची व्यवस्था अपग्रेड (living facilities upgraded) केली आहे

VIDEO: थंडीपासून बचावासाठी लडाखमधील जवानांसाठी अपग्रेटेड सुविधा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारतीय लष्कराने (Eastern Ladakh) पूर्व लडाखमधील सैनिकांसाठी राहण्याची व्यवस्था अपग्रेड (living facilities upgraded) केली आहे. आता याठिकाणी जवानांना जास्त सुविधा मिळतील. पूर्व लडाख भागात दरवर्षी नोव्हेंबरमध्ये 40 फुटापर्यंत बर्फ पडत असतो. तसेच येथील तापमान उणे 30 ते 40 डिग्रीपर्यंत जाते. या पार्श्वभूमीवर सैनिकांचे याठिकाणी राहणे सोयीस्कर करण्यासाठी सुविधा अपग्रेड करण्यात आल्या आहेत. 

पूर्वी लडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. 15 जूलैला पिपल्स लिबरेशन आर्मीसोबत झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आहेत. उभय देशांमध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत, पण अजूनही तोडगा निघालेला नाही. मोठ्या प्रमाणात सैनिकांची तैनाती करण्यात आल्याने त्यांच्या राहण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.  

एक दिवसात 50 हजार कोटींनी वाढली संपत्ती; जगातील सर्वात श्रीमंतामध्ये थेट...

भारतीय सैन्याने बुधवारी एक निवेदन सादर करत म्हटलं की, थंडीमध्ये सीमेवरील तैनात जवानांची क्षमता वाढवण्यासाठी लष्कराने सेक्टरमध्ये राहण्यासाठी सुविधा वाढवल्या आहेत. कॅम्पमध्ये विज, पाणी, हिटिंगची सुविधा, आरोग्य आणि स्वच्छतेच्या उत्कृष्ट सुविधा देण्यात आल्या आहेत. सैनिकांसाठी हिटरयुक्त टेंटचीही सुविधा दिली जात आहे. 

ऑक्टोबर महिन्यात चीन सरकारी मीडियासोबत जोडल्या गेलेल्या एका अधिकाऱ्याने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये चिनी सैनिकांसाठी थंडीच्या प्रदेशात तयारी केली जात असल्याचं दाखवण्यात आले होते. यात चिनी सैनिकांसाठी सोलार आणि विंड पॉवरची सुविधा, 24 तास गरम पाण्यात देण्यात येत असल्याचं म्हणण्यात आलं होतं. 

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. शिवाय चर्चेनंतरही चीनने माघार घेण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी सीमा भागात सैनिकांना अधिक काळ राहता यावे, यासाठी तयारी सुरु केली आहे. 
 

loading image