शशिकलांना "टोपी'; पनीसेल्वम यांना 'वीजेचा खांब'

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने एआयडीएमकेचे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणालाही न देता गोठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्ही. के. शशिकला यांच्या गटाला टोपी हे चिन्ह दिले असून ओ. पनीरसेल्वम यांच्या गटाला वीजेचा खांब हे निवडणूक चिन्ह दिले आहे.

दोन पाने हे एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह आयोगाने बुधवारी कोणालाही वापरता येणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आयोगाने आज दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हे दिली. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे आर. के. नगर येथील त्यांच्या मतदार संघाची जागा रिकामी झाली आहे. या जागेसाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ही जागा लढविण्यासाठी एआयडीएमकेमधील शशिकला गट आणि पनीरसेल्वम गट इच्छुक आहेत. या दोन्ही गटांनी या एआयडीएमकेच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर दावा केला होता.

शशिकला यांनी आयोगासमोर याचिका दाखल करत पक्षाच्या अधिकृत चिन्हाचा दावा केला होता. तर पनीरसेल्वम यांनी शशिकला या एआयडीएमकच्या 'अवैध आणि बेकायदा' सचिव असल्याचे म्हणत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे आयोगाने हे चिन्ह गोठविले असून दोघांना वेगवेगळे चिन्ह दिले आहे.

Web Title: EC allots 'hat' symbol to Sasikala, OPS gets 'electricity pole'