Omar Abdullah : जम्मू आणि काश्‍मीरमध्ये निवडणूका न घेण्याचे कारण जनतेला सांगा - उमर अब्दुल्ला

निवडणूक घ्या म्हणून आम्ही सारखे त्यांच्यासमोर भीक मागणार नाही
Omar Abdullah
Omar Abdullahesakal

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमध्ये निवडणुका का घेता येत नाही, हे निवडणूक आयोगाने छातीठोकपणे जनतेला सांगायला हवे, असे आव्हान आज नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी दिले.

निवडणूक घ्या म्हणून आम्ही सारखे त्यांच्यासमोर भीक मागणार नाही. आम्ही उपाशी, उघडे नाहीत. निवडणुका हा आमचा अधिकार आहे. त्यांना जर काश्‍मीरच्या जनतेचे हक्क काढून घेण्यात आनंद वाटत असेल तर आमचा हक्क खुशाल काढावा, अशीही टीका अब्दुल्ला यांनी केली.

Omar Abdullah
Jammu Kashmir : धक्कादायक! पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला! ५ ते ६ किलो IEDसह एकाला अटक

पत्रकारांशी बेालताना उमर अब्दुल्ला म्हणाले, की आयोगाने निवडणूका न घेण्याचे कारण जनतेला सांगितले पाहिजे. निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे का? असा सवालही केला. सर्वांनीच निवडणुकांबाबत जाब विचारायला हवा.

Omar Abdullah
Jammu and Kashmir : जम्मू-काश्‍मीर भारताचाच भाग; जी. के. रेड्डी यांचे पाकिस्तानला प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी लष्करी अधिकाऱ्याच्या वक्तव्याचा संदर्भ घेत सांगितले, की त्यांनी काश्‍मीरमधून लष्कर काढण्याची आताच वेळ नसल्याचे म्हटले आहे. मी देखील या मताशी सहमत आहे. आम्ही तर पूर्वीपासून हीच गोष्ट सांगत आहोत की, स्थिती सामान्य राहिलेली नाही.

Omar Abdullah
Snow Fall at Shrinagar: दानवेंना पडली श्रीनगरची भुरळ! दाजी म्हणाले, इकडं एकदा याचं

काश्‍मीरमध्ये जी-२० बैठक ही सत्यस्थिती दडवण्यासाठी घेतली जात आहे. परंतु स्थानिकांना या गोष्टी ठाऊक आहेत. आम्हाला पूर्वी एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी पाच मिनिटे लागायची, आता चाळीस मिनिटे लागत आहेत. या कारणांमुळे विद्यार्थी, कर्मचारी आणि रुग्णांना त्रास होत आहे, असा आरोप उमर अब्दुल्ला यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com