esakal | लोकशाहीची हत्या करून अर्थव्यवस्था 'आयसीयू'त : राहुल गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात काँग्रेस पक्षाकडून भाजप सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

लोकशाहीची हत्या करून अर्थव्यवस्था 'आयसीयू'त : राहुल गांधी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकशाहीची हत्या करून भारतीय अर्थव्यवस्थेला आयसीयूत पोहचविले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर आक्रमक होत काँग्रेसकडून आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात 'भारत बचाओ' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत रामलीला मैदानावर 'भारत बचाओ रॅली' घेण्यात येणार आहे. या रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन काँग्रेस करणार आहे. या रॅलीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे उपस्थित राहणार आहेत.

भारत बचाओ, भारत बचाओ! रॅली काढत काँग्रेस उतरलं दिल्लीच्या मैदानात

या रॅलीला संबोधित करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात काँग्रेस पक्षाकडून भाजप सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. भारताची अर्थव्यवस्था आयसीयूत पोहचविण्यात आली असून, लोकशाहीची होत असलेल्या हत्येविरोधात मी बोलणार आहे.

केंद्र विरुद्ध राज्ये; 'नागरिकत्व' कायद्यास पाच राज्यांचा विरोध