ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

ED takes strong action against Changur Baba : सहकाऱ्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्ता जप्त; एटीएस लखनऊच्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.
ED takes strong action against Changur Baba
ED takes strong action against Changur Babaesakal
Updated on

ED Action Against Changur Baba in Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला आणखी एक दणका दिला आहे. EDच्या लखनऊ झोनल टीमने मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.  या कारवाई एकूण  १३ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत सुमारे १३ कोटींपेक्षा जास्त असल्याचे समोर येत आहे. या सर्व मालमत्ता बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला भागात आहेत आणि नीतू नवीन रोहरा यांच्या नावाने खरेदी केल्या गेल्या आहेत.

हे प्रकरण चांगूर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित आहे. एटीएस लखनऊच्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. एफआयआरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर, परदेशातून निधी आणि राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कृत्यांचा आरोप आहे.

चांगूर बाबाने दुबईतील व्यावसायिक नवीन रोहरा सोबत कट रचला होता. यासाठी नवीन रोहरच्या दुबईतील कंपनी युनायटेड मरीन एफझेडईच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला. तसेच संशयास्पद स्त्रोतांकडून या खात्यात २१.०८ कोटी रुपये आले, जे नंतर एनआरई/एनआरओ खात्यांद्वारे भारतात आणण्यात आले. या पैशातून नवीन रोहराची पत्नी नीतू रोहरा यांच्या नावाने उत्तरौला येथे जमीन आणि मालमत्ता खरेदी करण्यात आल्या. अशीही माहिती ईडीच्या चौकशीत समोर आली आहे.

ED takes strong action against Changur Baba
Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

ईडीने २८ जुलै २०२५ रोजी चांगूर बाबा आणि ४ ऑगस्ट २०२५ रोजी नवीन रोहरा यांना अटक केली. सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे ईडीचे म्हणणे आहे

ED takes strong action against Changur Baba
Arvind Kejriwal to Amit Shah : ‘’...अशा मंत्र्याने, पंतप्रधानांनीही त्यांचे पद सोडावे का?'’ ; केजरीवालांचा अमित शहांवर निशाणा!

तर तपासात असे दिसून आले आहे की, चांगूर बाबा बलरामपूरमधील चांद औलिया दर्ग्यामधून एक नेटवर्क उभारत होता. येथे तो अनेकदा मोठ्या धार्मिक मेळावे आयोजित करत असे, ज्यामध्ये भारत आणि परदेशातील लोक सहभागी होत असत. तो लोकांना, विशेषतः दलितांना आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत हिंदू समुदायाला आमिष दाखवून आणि दबाव आणून धर्मांतरित करत होते, असे आरोप आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com