काळा पैसा पांढरा करणाऱ्या वकीलाला अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

काळा पैसा पांढरा करून देणारे व्यापारी पारसमल लोढा यांच्या प्रकरणात टंडन यांनी ईडीने अटक केली होती. लोढा यांच्या 25 कोटींपेक्षा अधिक संपत्ती सापडली होती. 

नवी दिल्ली - काळा पैसा पांढरा करून देण्याचा आरोप असलेले दिल्लीतील वकील रोहित टंडन यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी रात्री अटक केली. आज त्यांनी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर प्राप्तीकर विभागाने दिल्लीतील वकील रोहित टंडन यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. या छाप्यात 13.5 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. टंडन हे प्रसिद्ध वकील असून, टीअँडटी ही त्यांची लॉ फर्म आहे. तीन इनोव्हा गाड्यांमध्ये बॅगेत भरलेले पैसे सापडले होते.

काळा पैसा पांढरा करून देणारे व्यापारी पारसमल लोढा यांच्या प्रकरणात टंडन यांनी ईडीने अटक केली होती. लोढा यांच्या 25 कोटींपेक्षा अधिक संपत्ती सापडली होती. 

Web Title: ED arrests Rohit Tandon in money laundering case