Nirav Modi: नीरव मोदीला मोठा दणका! हॉंगकॉंगमधील कोट्यवधींची संपत्ती ईडीकडून जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirav-Modi-1111.jpg
नीरव मोदीला मोठा दणका! हॉंगकॉंगमधील कोट्यवधींची संपत्ती ईडीकडून जप्त

नीरव मोदीला मोठा दणका! हॉंगकॉंगमधील कोट्यवधींची संपत्ती ईडीकडून जप्त

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यात 10 हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला मुख्य आरोपी नीरव मोदी याला ईडीनं मोठा दणका दिला आहे. नीरव मोदीची हॉंगकॉंगमधील सुमारे अडीचशे कोटींची चल संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. (ED attaches assets worth Rs 253 cr of Nirav Modi in Hong Kong)

या कारवाईत जप्त केलेल्या संपत्तीमध्ये काही रत्न आणि ज्वेलरीसह बँकेतील रक्कमेचा समावेश आहे. नीरव मोदीची हॉंगकॉंगच्या बँकेत ३०.९८ मिलियन अमेरिकन डॉलर आणि ५.७५ मिलियन हॉंगकॉंग डॉलर इतकी रक्कम होती. यासंपूर्ण संपत्तीची एकत्रित रक्कम २५३.६३ कोटी रुपये होते, ईडीनं आपल्या निवदेनात ही माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेला ६४९८.२० कोटी रुपयांचा चुना लावल्यानं आर्थिक घोटाळाप्रकरणी नीरव मोदीची ईडी, सीबीआयकडून तपास सुरु आहे. या तपासादरम्यान नीरव मोदी ग्रुप ऑफ कंपनीजची हॉंगकाँगमध्ये काही मालमत्ता जी रत्ने आणि ज्वेलरीच्या रुपात तसेच खासगी बँकेच्या व्हॉल्टमध्ये काही रक्कम असल्याचं असल्याचं उघड झालं होतं. त्यानुसार ईडीनं ही ताजी कारवाई केली आहे. यापूर्वी ईडीनं नीरव मोदी आणि त्याच्याशी संबंधीत व्यक्तींची भारत आणि विदेशातील २,३९६.४५ कोटींची चल आणि अचल मालमत्ता जप्त केली होती.

दरम्यान, नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये असून त्याची प्रत्यार्पणाची कार्यवाही ही अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नीरव मोदीला भारतात आणण्यात येईल. त्यानंतर भारत-इंग्लंड प्रत्यार्पण कायद्यातील अटींच्या अधिन राहून भारतीय कायद्यांनुसार त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कारवाई होईल.