Who is Kalpana Soren: कल्पना सोरेन कोण आहेत? झारखंडच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची सुरुय चर्चा

Who is Kalpana Hemant Soren: हेमंत सोरेन हे आपली पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कल्पना सोरेन कोण आहेत हे जाणून घऊया
Who is Kalpana Hemant Soren
Who is Kalpana Hemant Soren
Updated on

नवी दिल्ली- सक्तवसुली संचालनालयाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरासह इतर ठिकाणी छापेमारी केली आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणात सोरेन यांच्या घरी रोख रक्कम, कार आणि काही कागदपत्रं मिळाल्याचा दावा केलाय. या सर्व घडामोडींमध्ये हेमंत सोरेन हे आपली पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कल्पना सोरेन कोण आहेत हे जाणून घऊया. (ED could arrest Jharkhand Chief Minister Hemant Soren who is kalpana soren wife of cm)

कल्पना सोरेन या झारखंडच्या पहिल्या मुख्यमंत्री होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. कल्पना यांचा जन्म १९७६ मध्ये रांची येथे झाला होता. त्या मुळच्या ओडिशाच्या मयूरभंजच्या राहणाऱ्या आहेत. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. कल्पना यांचे ७ फेब्रुवारी २००६ रोजी हेमंत सोरेन यांच्याशी लग्न झाले होते. कल्पना या एक प्ले स्कूल चालवतात. त्यांना दोन मुलं आहेत.

Who is Kalpana Hemant Soren
Hemant Soren: ईडीला सापडली कार, पत्नी होणार मुख्यमंत्री? हेमंत सोरेन गायब झाल्यापासून ४० तासात काय घडलं?

४८ वर्षांच्या कल्पना या आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवताना दिसतात. मात्र, राजकीय कुटुंबाशी संबंधीत असून देखील त्या राजकारणात सक्रीय नाहीत. कल्पना सोरेन यांच्याशी लग्न झाल्यापासून हेमंत सोरेन यांची राजकीय कारकीर्द उत्तम झाली आहे. २००९ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. कल्पना यांनी सध्या आपल्या परिवाराला जास्त महत्व दिलं आहे. त्या बिझनेस वूमन म्हणून ओळखल्या जातात. शिवाय त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्या झारंखडमध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत.

सध्या हेमंत सोरेन हे इडीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. अशा स्थितीत ते आपल्या पत्नीला मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करु शकतात. राज्यातील पक्षावर प्रभाव कायम राहावा आणि सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी ते हा निर्णय घेऊ शकतात.

Who is Kalpana Hemant Soren
News Update : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून ७ तास चौकशी

मीडिया रिपोर्टनुसार, झारखंडमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. आमदारांमध्ये एकमत झाल्यास कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. एखादा व्यक्ती आमदार नसताना मुख्यमंत्री होऊ शकतो. पण, त्याला सहा महिन्यांच्या कालावधीत आमदार म्हणून निवडून यावं लागतं. त्यामुळे कल्पना सोरेन या मुख्यमंत्री झाल्यास त्यांना निवडून यावं लागेल.

निशिकांत दुबेंचा दावा

भाजप नेते निशिकांत दुबे यांनी एक्सवर पोस्ट करत मोठा दावा केला आहे. ते म्हणालेत की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे गायब होऊन झारखंडच्या लोकांचा मानसन्मान मातीत मिळवत आहेत. हेमंत सोरेन आपली पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवू शकतात. ईडीच्या कारवाईच्या भीतीमुळे ते रांची मार्गे जाऊन गायब झाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com