Arvind Kejriwal Arrest: केजरीवालांच्या घरी सापडलेल्या ७० हजार रुपयांचं ईडीने काय केलं? आपच्या नेत्याचा दावा

Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीने २ तास चौकशी केल्यानंतर अटक केली. त्यांच्या अटकेनंतर देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे
Arvind Kejriwal Arrest
Arvind Kejriwal ArrestEsakal

Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीने २ तास चौकशी केल्यानंतर अटक केली. त्यांच्या अटकेनंतर देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. काल(गुरूवारी) रात्री ११ वाजता ईडीचे आधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेऊन ईडी ऑफीसला रवाना झाली.

दहावे समन्स जारी केल्यानंतर ईडीचे पथक सर्च वॉरंट घेऊन अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी पोहोचले. अशा परिस्थितीत आप नेते सौरभ भारद्वाज यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, केजरीवाल यांच्या घरातून फक्त 70 हजार रुपयांची रोकड सापडली आहे. मात्र, केजरीवाल यांच्या घरातून काय जप्त करण्यात आले आहे, हे केंद्रीय तपास यंत्रणेने अद्याप सांगितलेले नाही.

Arvind Kejriwal Arrest
Arvind Kejriwal Arrest: अटकेनंतर केजरीवाल मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होणार का? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

मुख्यमंत्र्याच्या घरातून ७० हजार कॅश मिळाली

सौरभ भारद्वाज म्हणाले, 'या छाप्यात मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण घराची झडती घेण्यात आली. फक्त 70 हजार रुपये रोख सापडले जे ईडीने परत केले आणि ते निघून गेले. मुख्यमंत्र्यांचा मोबाईल घेण्यात आला. या संपूर्ण छाप्यात कोणताही पुरावा, मालमत्तेची कागदपत्रे, अवैध पैसे सापडला नाही. शोध दरम्यान त्यांच्याकडून काय जप्त करण्यात आले आहे हे अद्याप ईडीने सांगितले नाही. झडतीदरम्यान सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा फोन जप्त केल्याचा दावाही केला होता.

Arvind Kejriwal Arrest
Arvind Kejriwal Arrest: राहुल गांधी केजरीवालांना कायदेशीर मदत करणार; कुटुंबियांशी साधला संवाद

केजरीवालांच्या अटकेनंतर आपवर पडणार प्रभाव

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे, विरोधी पक्षांची इंडिया आघाडी दिल्ली,हरियाणा, आणि गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला मात देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा मोठा फटका या निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, लोकसभा निवडणुकीची रणनिती आणि नियोजन यामध्ये ते केंद्रस्थानी होते. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षासमोर काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आपचे आणखी काही नेते देखील जेलमध्ये आहेत.

Arvind Kejriwal Arrest
Arvind Kejriwal Latest News: निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक! पक्षात हाहाकार, लोकसभा निवडणुकीची जबाबदारी 'या' दिग्गजांच्या खांद्यावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com