ED Summon To Kailash Gehlot: केजरीवाल सरकारविरोधात कारवाई थांबेना! दिल्लीच्या आणखी एका मंत्र्याला EDकडून समन्स

ED Summon To Kailash Gehlot: दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई सुरूच आहे.
ED issued summons to Delhi Minister Kailash Gahlot for questioning  in money laundering case linked to Delhi excise policy
ED issued summons to Delhi Minister Kailash Gahlot for questioning in money laundering case linked to Delhi excise policy

ED Summon To Kailash Gehlot: दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई सुरूच आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आता ईडीने दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांना समन्स पाठवले आहे. त्यांना आज, शनिवारी (३० मार्च) चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

कैलाश गहलोत यांच्यावर एक्साइज पॉलिसी ड्राफ्ट तयार केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांचा आरोप आहे की आप नेता कैलाश गहलोत हे देखील त्याच गटाचा भाग होते ज्यांनी या पॉलिसीचा ड्राफ्ट तयार केला होता. इतकेच नाही तर आप नेते गेहलोत यांच्यावर मद्य व्यापारी विजय नायर याला आपलं सरकारी घर दिल्याचा आरोप देखील आहे.

ED issued summons to Delhi Minister Kailash Gahlot for questioning  in money laundering case linked to Delhi excise policy
Lok Sabha Election 2024 : वायनाडमधील भाजप उमेदवारावर २४२ गुन्हे दाखल, राहुल गांधींविरोधात लढवणार निवडणूक

आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या कोठडीत आहेत. केजरीवाल यांना १ एप्रिलपर्यंत ईडीच्या ताब्यात राहावे लागणार आहे. गुरुवारी दिल्लीतील एखा कोर्टाने केजरीवाल यांच्या कोठडीत १ एप्रिल पर्यंतची वाढ केी होती. ईडीने कोर्टात सात दिवसांची रिमांड मागितली होती मात्र कोर्टाने त्यांची ही मागणी मान्य केली नाही.

तसेच कोठडीसाठीच्या नव्या अर्जात ईडीने म्हटले होते की, कोठडीत चौकशीदरम्यान मुख्यमंत्र्यांचे पाच दिवसांचे जबाब नोंदवण्यात आले होते आणि ते उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते. ईडीने सांगितले की, कोठडीदरम्यान इतर तीन लोकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

ED issued summons to Delhi Minister Kailash Gahlot for questioning  in money laundering case linked to Delhi excise policy
Mukhtar Ansari Death Reason : स्लो पॉइझन की हार्ट अटॅक, कसा झाला मुख्तार अन्सारीचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये 'हे' कारण आलं समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com