
ईडीच्या ज्या अधिकाऱ्यांनी आमदार विद्यार्थी हॉस्टेलवर छापा टाकला त्यांच्यावर चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईडीने तामिळनाडु सरकारमधील ग्रामीण विकास मंत्री आय पेरियासामी आणि त्यांचा मुलगा आमदार आयपी सेंथिल कुमार यांच्या मालमत्तांवर धाड टाकली होती. आमदार पिता पुत्रावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणीच ईडीने छापे टाकले होते.