
WazirX क्रिप्टो एक्सचेंजवर ईडीची कारवाई; 65 कोटींची संपत्ती गोठवली
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) प्रसिध्द क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वझीरएक्स चालवणाऱ्या झान्माई लॅबच्या संचालकांच्या ठिकाणांची झडती घेतली. तसेच या कारवाईदरम्यान त्यांची 64.67 कोटी रुपये बँक बॅलन्स गोठवण्यात आले आहे.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत परकीय चलन विनिमय कायद्याच्या कथित उल्लंघनाच्या आरोपाखाली वझीरएक्सशी संबंधित दोन प्रकरणांची ईडी चौकशी करत असल्याची माहिती दिली होती. त्याच्या काही दिवसातच ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रमुख क्रिप्टो एक्सचेंजेसपैकी एक असलेल्या वजीरएक्स च्या माध्यमातून सुमारे 2,790 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंगची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ED) करत आहे, राज्यसभेत ही माहिती देण्यात आली आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तरात सांगितले की, ईडी क्रिप्टोकरन्सीशी संबंधित दोन प्रकरणांची या क्रिप्टो एक्स्चेंजविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) अंतर्गत चौकशी करत आहे.
हेही वाचा: Amazon sale : स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा डिटेल्स
WazirX हे एक क्रिप्टो करन्सी एक्सचेंज असून याचा वापर भारतात क्रिप्टो व्यवहारांसाठी अनेकजण करतात, हे वापरणे इतर एक्सचेंजच्या तुनेत अधीक सोपे असल्याने हे खूप लोकप्रीय बनले आहे. त्यामुळे WazirX हे भारतातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. हे पीअर टू पीअर क्रिप्टो व्यवहार यावरून करता येतात. म्हणजेच, यावरून बिटकॉइन, इथरियम, रिपल, ट्रॉन, लाइटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करता येते.
हेही वाचा: OnePlus चा सर्वात स्वस्त फोन लॉन्च, किंमत १६ हजारांहून कमी
Web Title: Ed Searches Director Of Wazirx Cryptocurrency Exchange Freezes Its Bank Assets Worth Rs 6467
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..