
सक्तवसुली संचालनालयाने ऑनलाइन जुगार अॅप संबंधित प्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अनेक दिग्गज अभिनेते आणि प्रसिद्ध व्यक्तींना जाहिरात प्रकरणी नोटीस जारी केलीय. आता गूगल आणि मेटालासुद्धा नोटीस पाठवण्यात आलीय. ईडीने आरोप केलाय की या दोन्ही कंपन्या जुगाराच्या अॅप्सना प्रोत्साहन देण्याचं काम करतायत. त्यांच्या जाहीराती आणि वेबसाइट्सना डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्राधान्य दिलं जातंय.