esakal | WazirX आणि त्याच्या डायरेक्टर्सना मनी लाँड्रींग प्रकरणी ED ची नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

WazirX आणि त्याच्या डायरेक्टर्सना मनी लाँड्रींग प्रकरणी ED ची नोटीस

WazirX आणि त्याच्या डायरेक्टर्सना मनी लाँड्रींग प्रकरणी ED ची नोटीस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयने (ED) 11 जून रोजी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज WazirX आणि त्याचे डायरेक्टर निश्चल शेट्टी आणि समीर म्हात्रेला नोटीस दिली आहे. त्यांना ही 'कारणे दाखवा नोटीस' विदेशी चलन नियंत्रण कायदा, 1999 (FEMA) च्या अंतर्गत 2,790.74 कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीशी निगडीत व्यवहारांसाठी पाठवली गेली आहे. एजन्सीने एका वक्तव्यात म्हटलंय की, ED ने चीनच्या मालकीच्या 'अवैध' ऑनलाईन बेटींग ऍप्लिकेशनमध्ये चालू असलेल्या मनी लाँड्रींग तपासाच्या आधारावार FEMA ने तपास सुरु केला आहे.

हेही वाचा: अविवाहित होत्या, मग नुसरत जहाँ डोक्यामध्ये सिंदूर का भरायच्या?

एजन्सीने म्हटलंय की, चीनच्या नागरिकांनी जमलेल्या भारतीय रुपयांना क्रिप्टोकरन्सी Tether मध्ये कन्व्हर्ट करुन जवळपास 57 कोटी रुपये बेकायदेशीर रित्या लुटले होते. त्यानंतर परदेशातून मिळालेल्या आदेशाच्या आधारावर त्यास केमॅन द्विपमध्ये रजिस्टर्ड एक्सचेंज, बिनेन्स वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले होते. ED ने म्हटलंय की, असं आढळलंय की WazirX चे ग्राहक कोणत्याही योग्य डॉक्युमेंट्सशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचं स्थान आणि राष्ट्रीयतेशिवाय किंमती क्रिप्टोकरन्सीला ट्रान्सफर करु शकतात. ज्यामुळे हे मनी लॉंड्रीग अथवा दुसऱ्या बेकायदेशीर गोष्टी शोधणाऱ्या युझर्ससाठी एक सुरक्षित ठिकाण बनतं. आपल्या 31 मेच्या स्पष्टीकरणामध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांना सावधानता बाळगण्यास सांगून कायद्याच्या काही प्रावधानांवर विशेषरुपाने प्रकाश टाकला आहे.