esakal | अविवाहित होत्या, मग नुसरत जहाँ भांगेत सिंदूर का भरायच्या?
sakal

बोलून बातमी शोधा

MP Nusrat Jahan answered to Islamic Maulavi for criticism

अविवाहित होत्या, मग नुसरत जहाँ भांगेत सिंदूर का भरायच्या?

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: तृणमुल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आहेत. पती निखिल जैनपासून त्या विभक्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी नुसरत जहाँ यांचा 'घोटाळेबाज' म्हटले आहे. आमचे लग्न टर्कीमध्ये झालेय. त्यामुळे भारतात आमचा विवाह कायदेशीररित्या वैध नाहीय असे नुसरत जहाँ यांनी म्हटले होते. (What a fraud Dilip Ghosh asks how Nusrat Jahan wore sindoor being unmarried)

त्या बद्दल पश्चिम बंगाल भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी नुसरत जहाँ यांच्यावर टीका करताना त्यांना 'घोटाळेबाज' म्हटले आहे. दिलीप घोष हे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी ओळखले जातात. "विवाहित महिला म्हणून नुसरत जहाँ यांनी संसदेत शपथ घेतली होती" असे दिलीप घोष म्हणाले.

हेही वाचा: दहावीच्या मूल्यमापनाच्या पहिल्याच दिवशी खेळखंडोबा

"काय फसवणूक आहे. तृणमुलने ज्या व्यक्तीला तिकिट दिले, त्यांनी शपथ घेतली. आता सांगतात की, लग्न झालेलच नाही. त्यांनी डोक्यात सिंदूर भरला. पूजा केली आणि निवडणूक जिकंली" असे दिलीप घोष म्हणाले. २०१९ मध्ये नुसरत जहाँ आणि निखिल जैन दोघेही कोलकात्तामध्ये इस्कॉनने आयोजित केलेल्या एका रथयात्रेत सहभागी झाले होते.

हेही वाचा: विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंत तर... -आशिष शेलार

त्या रथ यात्रेचा उल्लेख करुन दिलीप घोष यांनी फक्त नुसरत जहाँ यांच्यावरच नाही, तर ममता बॅनर्जी यांच्यावर सुद्धा टीका केली. ममता बॅनर्जी स्वत: नुरसत जहाँ आणि निखिल जैनच्या स्वागत सोहळ्याला उपस्थित होत्या. "ज्यांचं लग्नच झालेलं नाही, अशा व्यक्तीच्या लग्नाला ममता बॅनर्जी कशा गेल्या?. डोक्यामध्ये सिंदूर भरतात. गर्भवती होतात आणि आता अविवाहित आहेत, म्हणून जाहीर करतात" अशा शब्दात दिलीप घोष यांनी टीका केली.