

ED Raids Expose Multi Billion Cough Syrup Racket Across Three States
Esakal
सक्तवसुली संचालनालयाने टाकलेल्या छाप्यात कफ सिरप रॅकेट आणि अवैध तस्करी प्रकरणी मोठा पर्दाफाश झाला आहे. ४० तासांपेक्षा अधिक तास ईडीने छापा टाकला. यानंतर मिळालेल्या पुराव्यांनुसार २२० संचालकांच्या नावानं ७०० पेक्षा अधिक कंपन्या बनवण्यात आल्या. या कंपन्यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची कमाई करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे यातील बहुतांश कंपन्या फक्त कागदावरच आहेत.