Edible oil price hike India
esakal
Edible Oil Price Hike in India : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर महागाईचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. आगामी काळात पाम, सोयाबीन आणि मोहरी तेलासह विविध खाद्यतेलांच्या किमती वाढू (Palm Oil Prices) शकतात. जागतिक बाजारपेठेतील पुरवठ्यावर निर्माण झालेला दबाव, इंडोनेशियातील दुष्काळ आणि बायोडीझेल निर्मितीसाठी पाम तेलाची वाढती मागणी ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे भारतात खाद्यतेलाच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होऊ शकतो.