खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर ७ ते १० रुपयांनी घसरण; सर्वसामान्य जनतेला दिलासा | Edible Oil Prices Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Edible Oil Prices Updates
खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर ७ ते १० रुपयांनी घसरण; सर्वसामान्य जनतेला दिलासा

खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर ७ ते १० रुपयांनी घसरण; सर्वसामान्य जनतेला दिलासा

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांनंतर देशांतर्गत बाजारात मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन, पामोलिनसह सर्व खाद्यतेलाच्या किमती कमी होताना दिसत आहेत. या खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर ७ ते १० रुपयांनी घसरण झाल्याने महागाईच्या चटक्यांनी हैराण झालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. नुकतीच सरकारने पेट्रोल, डीझेलच्या दरात कपात केली.त्यापाठोपाठ खाद्यतेलाच्या किमतीही कमी होऊ लागल्याने महागाईमुळे बजेट बिघडलेल्या जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. (Edible Oil Prices Updates)

सध्या स्थानिक पातळीवरील मागणी सोयाबीन, भुईमूग, सरकी आणि मोहरीच्या तेलाने भागवली जात आहे. मात्र आता इंडोनेशियाने २३ मे पासून भारताला होणाऱ्या पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी हटवल्याने सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किमती जवळपास १०० डॉलरने खाली आल्या आहेत. यामुळे आयातही सुरू झाली असून येत्या काही दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आवक सुरळीत झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Edible Oil Prices Fall Rs 7 To 10 Per Liter Government Reduced Prices Of Petrol And Diesel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top