अर्थ मंत्रालयातील पत्रकारांच्या प्रवेशाबाबत 'एडिटर्स गिल्ड'कडून निषेध

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

पत्रकाराने जबाबदारीने आणि विशिष्ट मर्यादेत राहणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी पत्रकारांच्या मंत्रालयातील प्रवेशावर बंधन आणणे हा उपाय नव्हे, अशी ठाम भूमिका 'एडिटर्स गिल्ड'ने घेतली आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या केंद्रीय अर्थ मंत्रालयात पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याच्या मंत्रालयाच्या निर्णयाचा 'एडिटर्स गिल्ड'कडून निषेध नोंदविण्यात आला आहे. 

पत्रकाराने जबाबदारीने आणि विशिष्ट मर्यादेत राहणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी पत्रकारांच्या मंत्रालयातील प्रवेशावर बंधन आणणे हा उपाय नव्हे, अशी ठाम भूमिका 'एडिटर्स गिल्ड'ने घेतली आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा आदेश म्हणजे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर आणलेली गदा असल्याचेही 'एडिटर्स गिल्ड'ने म्हटले आहे. 'एडिटर्स गिल्ड'च्या निषेधानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे. अर्थ मंत्रालयातील पत्रकारांच्या प्रवेशावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नसून प्रवेशप्रक्रिया शिस्तशीर करण्यात आल्याचा दावा अर्थमंत्रालयाने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Editors Guild of India has issued a statement on journalist enters finance ministry