तीनशे बनावट कंपन्यांवर 'ईडी'ची कारवाई

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

नोटाबंदीच्या काळात राजकीय नेत्यांना काळा पैसा पांढरा करून दिल्याचा आरोप असलेल्या सोळा राज्यातील 300 ठिकाणच्या बनावट कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने आज (शनिवार) छापे टाकले आहेत.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या काळात राजकीय नेत्यांना काळा पैसा पांढरा करून दिल्याचा आरोप असलेल्या सोळा राज्यातील 300 ठिकाणच्या बनावट कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने आज (शनिवार) छापे टाकले.

अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई, दिल्ली, बंगळूर, भुवनेश्‍वर, कोलकाता आणि अन्य काही शहरांमध्ये आज छापे टाकले. छाप्यादरम्यान संचालनालयाला कंपन्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यातून या कंपन्यांनी बेकायदेशीर व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. संचालनालयाने यापूर्वीच बनवाट कंपनीद्वारे बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्या काही व्यक्तींना अटक केली आहे. मागील महिन्यातच दोन व्यक्तींना राजधानी दिल्लीतून ताब्यात घेतले आहे.

शासनाकडे असलेल्या नोंदीप्रमाणे भारतात 15 लाख नोंदणीकृत कंपन्या आहेत. मात्र, त्यापैकी केवळ सहा लाख कंपन्यांच वार्षिक प्राप्तिकर विवरणपत्र भरतात. उर्वरित कंपन्यांपैकी बहुतेक कंपन्या कर वाचविण्यासाठी बनावट चलने सादर करत असल्याचेही आढळून आले आहे.

Web Title: EDs action against shell comapanies