शिकलेल्यांची टोळी शिकार करताना अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

चिक्कमंगळूर - शिक्षणानं बुद्धी आणि सामाजिक संवेदना वाढतात की नाही, असा प्रश्न चिक्कमंगळूरमधील एका घटनेनं पडलाय. कर्नाटकातल्या भद्रा व्याघ्र प्रकल्पामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री घुसून शिकार करणाऱया टोळीला पोलिसांनी अटक केलीय आणि त्यामध्ये 'आयटी'मधले आणि उच्चशिक्षित कर्मचारी आहेत; तर दोघेजण रायफल असोसिएशनचे सदस्य आहेत.
 
अटक केलेल्यांमधील एकजण 'इन्फोसिस' या प्रख्यात आयटी कंपनीचा कर्मचारी आहेत. एक पर्यावरण अभियंता आहे. एकजण लाकूड उद्योगात आहे; तर एकजण कॉलेजचा विद्यार्थी आहे. याशिवाय कर्नाटक राज्य रायफल असोसिएशनचा मेंबर आणि ग्लोबल ट्रॅव्हल्स या कंपनीचा कर्मचारीही अटकेत आहे. या उच्चशिक्षित संशयित आरोपींव्यतिरिक्त स्थानिक अड्डीगुंडी खेड्यातील चारजण आणि नजिकच्या कॉफी मळ्याचा मालकही अटकेत आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेल्यांपैकी आठजण बंगळूरचे आहेत. ते उच्चशिक्षित आहेत आणि नोकरी-व्यवसायात वरच्या पदांवर आहेत. त्यांनी दोन सांबरांची शिकार केली. त्यापैकी एका सांबराचे वय 12 ते 15 वर्षे होते आणि वजन होते तब्बल 350 ते 400 किलो.
 
रविवारी पहाटेपर्यंत चाललेल्या पोलिस कारवाईत दोन हत्यारांसह संशयित आरोपींना अटक झाली आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हे दाखल केले आहेत.  अटक केलेल्यांची नावे अशीः कर्नाटक राज्य रायफल असोसिएशनचा सदस्य मोहंमद समीर अहमद (वय 29), कॉफी मळ्याचा मालक अख्तर अहमद (67), लाकूड व्यावसायिक रफिक अहमद (44), शेत मळ्याचा मालक मोहम्मद रिझवान (46), पर्यावरण अभियंता सईद अहमद (30), जैन कॉलेजचा विद्यार्थी मीर नकीब अली (18), ग्लोबल ट्रॅव्हल कंपनीचा मीर नय्यर अली (30), इन्फोसिसचा कर्मचारी मीर मुदस्सर अली (23) , अट्टीगुंडी खेड्यातील अरूण (23), हरिष (25), चेतन (26) आणि प्रसन्न (18). रिअल इस्टेट एजंट आणि शार्प शुटर रफिक अहमद फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
Web Title: Educated youths arrested while poching