शिक्षण, पत्रकारितेतील काहींचा नक्षल्यांना पाठिंबा : राकेश सिन्हा

राज्यसभेत आज नक्षलवादी हिंसाचारावरून सत्तारुढ सदस्य व विरोधकांत शाब्दिक चकमकी उडाल्या.
Rakesh Sinha
Rakesh SinhaSakal
Summary

राज्यसभेत आज नक्षलवादी हिंसाचारावरून सत्तारुढ सदस्य व विरोधकांत शाब्दिक चकमकी उडाल्या.

नवी दिल्ली - विद्यापीठे, महाविद्यालयांतील शिक्षणतज्ज्ञ व पत्रकार (Reporter) म्हणविणारे काही लोक शहरी नक्षल्यांच्या (Naxals) नावाखाली देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करत आहेत, अशी टिप्पणी भाजपचे (BJP) राकेश सिन्हा (Rakesh Sinha) यांनी आज राज्यसभेत करताच त्यांना विरोधी बाकावरून तीव्र प्रत्युत्तर मिळाले. त्यावर गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी, विध्वसंक, मानवताविरोधी व भारतविरोधी डाव्या विचारसरणीची नक्षल चळवळीची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळात शेवटाकडे सुरू आहे, असे सांगताच पुन्हा गदारोळ झाला.

राज्यसभेत आज नक्षलवादी हिंसाचारावरून सत्तारुढ सदस्य व विरोधकांत शाब्दिक चकमकी उडाल्या. सिन्हा, प्रकाश जावडेकर आदींच्या नक्षलवादी चळवळीबाबतच्या प्रश्नांना काँग्रेस, डावे सदस्य आदींनी आक्षेप घेतले. पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ म्हणविणारे लोक त्यांच्याआडून नक्षलवादाला खतपाणी घालत आहेत व मुख्य प्रवाहातील काही पक्ष त्यांना पाठिंबा देतात, असे सिन्हा यांनी सांगितले.

राय म्हणाले, की भारतविरोधी घोषणा देणारे, भारतीय महापुरुषांचा अपमान करणारे कधीही रचनात्मक, मानवतावादी भारतीय विचारसरणीचे वाहक असू शकत नाहीत. यांना पाठिंबा देणारे बुद्धिवादी मंडळी या लोकांच्या आड लपतात. अशा शहरी नक्षलवाद्यांना शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मोदी सरकारने विस्तृत कार्ययोजना तयार केली आहे.

Rakesh Sinha
हिजाब प्रकरणी सुप्रिया सुळेंचा भाजपवर घणाघात; म्हणाल्या, 'ही मोरल पॉलिसींग...'

आर्थिक मदतीचा उपयोग नाही - सहस्रबुद्धे

महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक व आयटीआय यांना केंद्र सरकारने लक्षणीय आर्थिक मदत देऊ केली तरी महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे ते त्याचा उपयोग करू शकत नाहीत, असे डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी सांगताच शिवसेना सदस्य भडकले. सहस्रबुद्धे म्हणाले, की केंद्राने राज्यातील पॉलिटेक्निक-आयटीआय शिक्षणसंस्थांसाठी १३० कोटी रुपये दिले, त्याचा २०१८ ते २०२१ या काळात राज्याने वापर केला नाही. आणखी सुमारे ६ कोटींचा निधी केंद्रांना दिला, त्याचाही उपयोग राज्याने केला नाही याचे कारण काय? असा सवाल सहस्रबुद्धे यांनी विचारला.

नक्षलवाद्यांचा प्रभाव ४६ जिल्ह्यांपुरताच

नवी दिल्ली : भारतात मागील ११ वर्षांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. २०१० मध्ये दहा राज्यांमधील ९६ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया होत होत्या, त्या आता फक्त ४६ जिल्ह्यांपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत दिली.

प्रश्‍नोत्तरांच्या तासात नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की,‘नक्षलवाद मिटविण्याच्या हेतूने मोदी सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे नक्षलवाद्यांच्या प्रभावाचे भौगोलिक क्षेत्र कमी झाले आहे. अकरा वर्षांपूर्वी ९६ जिल्ह्यांत त्यांच्या चालणाऱ्या कारवाया आता फक्त ४६ जिल्ह्यांपुत्याच सीमित झाल्या आहेत. तसेच, २०१८ च्या तुलनेत नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक घटनांची संख्याही ७० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळेच अशा घटनांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही १००५ वरून १४७ पर्यंत कमी झाली आहे.’ नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नक्षलग्रस्त भागांमध्ये विकासाचे धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे, असेही नित्यानंद राय यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com