CBSE Exam 2021: 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; वाचा सविस्तर

वृत्तसंस्था
Thursday, 31 December 2020

केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांनी काही वेळापूर्वी लाइव्ह वेबिनारद्वारे शिक्षकांशी संवाद साधताना बोर्ड परीक्षा पद्धतीबद्दल माहिती दिली.

CBSE Exam 2021: नवी दिल्ली : सीबीएसई 2021च्या 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा ४ मे पासून सुरू होतील आणि १० जूनपर्यंत चालतील. तसेच १ मार्चपासून प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होणार आहे.

सीबीएसई 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेची संपूर्ण वेळापत्रक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) cbse.nic.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. तेथून विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करून घ्यावे. दहावी आणि बारावीची वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.

''श्रीराम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल'' : स्वामी गोविंददेव महाराज​

असे डाउनलोड करा वेळापत्रक
- पहिल्यांदा सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जा.
- त्यानंतर 'अलीकडील घोषणा' (Recent Announcements) विभागातील तुमचा वर्ग निवडा.
- आता तुम्ही सीबीएसई परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करू शकता.

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) नोव्हेंबरमध्ये बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करते आणि फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. पण यंदा कोरोना व्हायरसमुळे बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशीर झाला आहे.

Welcome 2021 : न्यूझीलंडमध्ये झालं नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत; पाहा व्हिडिओ!

परीक्षा ऑफलाइन होणार 
केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांनी काही वेळापूर्वी लाइव्ह वेबिनारद्वारे शिक्षकांशी संवाद साधताना बोर्ड परीक्षा पद्धतीबद्दल माहिती दिली. 24 हजाराहून अधिक सीबीएसई शाळा ग्रामीण भागात आहेत, त्यामुळे आता ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे बोर्ड परीक्षा फक्त ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील.

प्रवेशपत्र (Admit Card) कधी मिळणार?
सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेश पत्र हे परीक्षेला बसण्यासाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सीबीएसईच्या नियमित विद्यार्थ्यांना शाळांकडून प्रवेश पत्रे दिली जातात, तर खासगी विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागते.

SSC-CGL 2020: SSCकडून अधिसूचना प्रसिद्ध; पदांसह जाणून घ्या इतर माहिती

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education minister announced CBSE 10th and 12th board exams dates