भगवद् गीता सर्वांच्या वर, बायबलसोबत सांगड घालू नका : कर्नाटक मंत्री

Karnataka Minister on Bible Row
Karnataka Minister on Bible RowGoogle

बंगळुरू : सध्या कर्नाटकमध्ये बायबलवरून वाद सुरू आहे. दुसरीकडे शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्याचा विचार कर्नाटक सरकार करत आहे. त्यावरूनच आता कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी एक विधान केले आहे. भगवद् गीता आणि बायबलची सांगड घालू नका. भगवद्गीता सर्वांच्या वर आहे, असं नागेश म्हणाले.

Karnataka Minister on Bible Row
शाळेत जबरदस्तीनं बायबल शिकवल्यास कडक कारवाई; शिक्षणमंत्र्यांचा इशारा

भगवद् गीता हा धार्मिक ग्रंथ नाही. त्यामध्ये धार्मिक प्रथा दिलेल्या नाहीत. भगवद् गीता प्रार्थना कशी करावी हे तुम्हाला सांगत नाही. भगवद् गीता सर्वांपेक्षा वरचढ आहे. शालेय अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण म्हणून विद्यार्थ्यांचे मनोबल सुधारण्यासाठी भगवद् गीतेचा समावेश करण्यास तयार आहोत, असं बी. सी. नागेश म्हणाले.

कर्नाटकच्या एका कॉन्व्हेंटमध्ये बायबल अनिवार्य केले होते. त्यानंतर वाद सुरू झाला. त्यानंतर कर्नाटक शिक्षण विभागाने बंगळुरू येथेल क्लेरेन्स हायस्कूलला कारणे दाखवा नोटीस बजावली. शाळेने कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिल्यानंतर सरकार आवश्यक ती कारवाई करेल, असे मंत्री बीसी नागेश यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटकमधील बायबल वादावर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. शाळा बिगर ख्रिश्चन विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा यांनी केला. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने सोमवार, 25 एप्रिल रोजी बंगळुरू जिल्हा आयुक्तांना पत्र लिहून क्लेरेन्स शाळेविरुद्ध चौकशी सुरू करण्यास सांगितले. शाळेने बायबल शिकवणे अनिवार्य करण्याचा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 चे उल्लंघन आहे या निरीक्षणावर आधारित NCPCR ने हा आदेश जारी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com