कोरोनावर उपाय असल्याचा दावा कोणी करत असल्यास पुरावे मागायला हवेत : WHO

Effective Covid vaccine may take 2.5 years: WHO special envoy Dr David Nabarro
Effective Covid vaccine may take 2.5 years: WHO special envoy Dr David Nabarro

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला कोरोनावर कोणतंही औषध किंवा उपाय उपलब्ध नाही. जर कोणी असा दावा करत असेल तर त्यांच्याकडे पुरावा मागितला पाहिजे असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी व्यक्त केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. कोरोना व्हायरसवर परिणामकारक आणि प्रभावी लस मिळवण्यासाठी जगाला अजून अडीच वर्ष तरी लागतील असेही ते म्हणाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

परिणामकारक लस मिळणं महत्त्वाचं नसून, तिची मोठ्या प्रमाणात निर्मिती होणंही गरजेचं असल्याने यासाठी इतका काळ लागेल असं त्यांचे म्हणणे आहे. लस आल्यानंतरही ती एखाद्याला दिल्यानंतर तो पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करण्यास वेळ लागेल. अनेक गोष्टी अद्याप सिद्ध व्हायच्या आहेत, असं डेव्हिड नाबारो यांनी सांगितलं आहे. 
----------------
जिओमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक; आता कोणी केली गुंतवणूक?
----------------
चांगली बातमी : भारतात कोरोनावरील दुसरी लसही विकसित
----------------
जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनावरील लसची निर्मिती सुरु असून अनेकांनी मानवी चाचणीही सुरु केली आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असताना डेव्हिड नाबारो यांनी सांगितलं की, एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याचा संसर्ग होणार नाही याची आपल्याकडे काहीच माहिती नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रस्तावित लस सुरक्षित आहेत का? म्हणजे एखाद्याला ती दिल्यानंतर त्याचे वेगळे परिणाम तर होणार नाहीत ना. जेव्हा तुम्ही लसचा वापर करता तेव्हा त्याचे काही उलट परिणाम होणार नाहीत याची काळजी घेणंही महत्त्वाचं असल्याचे डेव्हिड नाबारो यांनी सांगितलं आहे. दरम्यान, २०२१ च्या सुरुवातीला लस आली तरी जास्त मदत होणार नाही. कारण जगभरात ती लस उपलब्ध व्हावी यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याची गरज लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com